भारतीय रेल्वेवर मध्य रेल्वेचे माटूंगा स्थानक पहीले स्थानक आहे जे पुर्णपणे महीला कर्मचा-यांच्या द्वारे चालविण्यात येत आहे त्यासाठी माटूंगा स्थानकाचे नाव लिम्का बुक ऑफ रिकार्डस मध्ये दर्ज आहे. मध्य रेल्वेने 8 मार्च 2018 ला अंतरराष्ट्रीय महीला दिवसाचे आयोजन आणि या दिवसाला जास्त खास बनविण्यासाठी याचे अधिकारि आणि कर्मचारीच नाही तर आमच्या देशाच्या सर्व महीलासाठी ऑल वुमेन क्रू नेमणुकी द्वारा मुंबई आणि पुणेच्या दरम्यान धावणारी प्रतिष्ठित डेक्कन क्वीन एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांच्या म्हणन्यानुसार क्लिष्ट आणि तात्रिक रेल्वे संचालनासहित सर्व क्षेत्रात महीलाची उपस्थिती ओळखण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.
त्याच्यानुसार मध्य रेल्वेवर नवीन प्रयोगासाठी डेक्कन क्वीन एक्सप्रेस वर सर्व महीला क्रू ची नेमणूक करण्यात आली आहे.
श्रीमती सुरेखा यादव, लोको पायलट मेल आणि आशियातील पहीली महीला ट्रेन चालक, चालक म्हणून तर वरिष्ठ सहायक लोको पायलट श्रीमती तृष्णा जोशी, यांच्या समवेत श्रीमती श्वेता घोणे या डेक्क्न क्वीन एक्सप्रेसच्या गार्डच्या स्वरूपात काम करण्यासाटी सम्मानित करण्यात आले आहे जी महीला दिनी हीरवा झेडा दाखवून गाडी रवाना करतील. तिकीट तपासणीस, आरपीएफ आणि विद्युत सहायक इत्यादी सर्व कर्मचारी या महीलाच राहतील.
मुंबई विभागता लोकमान्य टिळक टर्मिैनस येथे प्रवाशी आणि वैगन डेपोत खुप महीला कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या साठी एक महीला कक्षाचे नवीनीकरण केले जात आहे तसेच तेथे जलशुध्दीकरण यंत्र, डायनिंग टेबलसह खुर्च्या, ड्रेसिंग टेबल, भींतीवरील घडयाळ, थर्मस फ्लास्क पडदे, सैनिटरी नॅपकीन इत्यादी अनेक सुविधा 8 मार्च अंतरराष्ट्रीय महीला दिवस 2018 पासून सुरू करण्यात येतील.
मध्य रेल्वेच्या अन्य स्थानकावर जेथे महीला कर्मचा-यांची संख्या जास्त आहे तेथे अशाच प्रकारच्या सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महीला दिवसाच्या निमित्यांने छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा उपनगरीय भागात एक विशेष कक्ष उघडण्यात येणार आहे जो 8 मार्च 2018 रोजी महीला कर्मचा-यांद्वारे संचलित होईल. महीला प्रवाशांचे रेल्वे प्रवास अधिक सुखद बनविण्यासाठी त्यांच्याकडे सूचना मागविण्यात येतील. यानंतर या सर्व सूचनांचा रेल्वे प्रशासनाकडून आढावा घेतला जाईल आणि यथासंभव लागू करण्यात येतील.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री डी.के. शर्मा यांनी मध्य रेल्वेच्या सर्व विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना आदेश दिले आहेत की, माटूंगा स्थानकाचा अनुभव सफल क्रियान्वयन आणि सकारात्मक प्रतिक्रिये पासून प्रेरित होऊन आपल्या विभागात अर्थात नागपुर, भुसावल, पुणे आणि सोलापुर विभागात सुध्दा एक स्थानक संपुर्ण स्वरूपात महीला कर्मचा-या द्वारे चालविण्यासाठी नामांकित करावे. याप्रमाणे नागपुर स्थानकापासून 3 किलोमीटर दूर रेल्वे स्थानक अजनी स्थानक संपुर्णपणे महीला कर्मचा-या द्वारे 8 मार्च 2018 पासून कार्यान्वयीत होईल.
मध्य रेल्वेला हे सांगतेवेळी अंत्यंत आनंद होत आहे की मध्य रेल्वेत महीला कर्मचा-यांची एक मोठी सेना आहे, खेळात, सुरक्षा वा ट्रेन परिचालनासह प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मोठे यश मिळविले आहे. अंतरराष्ट्रीय महीला दिवसाच्या निमित्ताने महीला सशक्तिकरणासाठी प्रयत्नशील आहोत. मध्य रेल्वेच्या यशस्वी महीलांमध्ये श्रीमती सुरेखा यादव ज्या आशियातील पहील्या लोको पायलट आहेत व ज्यांना राष्ट्रपतींनी अलिकडेच पुरस्कार देऊन गौरव केला आहे. अशाच प्रकारे श्रीमती मुमताज काजी ज्या मोटरउमन आहेत त्यांनाही राष्ट्रपतींनी पुरस्कार देऊन गौरव केला आहे. मुंबई विभागातील पहीला स्टेशन मास्टर श्रीमती ममता कुळकर्णी या महीला कर्मचा-या द्वारे संपुर्णपणे संचलित स्थानकाच्या व्यवस्थापनाची संपुर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. रेल्वे सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षक श्रीमती रेखा मिश्रा यांचेही कार्य उल्लेखनीय आहे. श्रीमती रेखा यांनी घरातून पळालेल्या अथवा अपहरण करण्यात आलेल्या जवळ-पास 900 लहान मुलांना शोधून काढून त्यांच्या पालकांकडे सोपविले आहे. यावर्षी महीला दिवसाच्या निमित्ताने त्यांना राष्ट्रपति पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे.
अंतरराष्ट्रीय महीला दिवस कार्यक्रमांतर्गत महीला सशक्तिरणाचा क्षेत्रात काम करणा-या प्रख्यात व्यक्तिचे सेमिनार, व्याख्यान, ऑडियो-वीडियोचे प्रस्तुतिकरणासह अनेक उपक्रम राबविण्याची मध्य रेल्वेने तयारी केलेली आहे. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ऑडिटोरियम येथे 8.3.2018 रोजी महीला कर्मचा-यांच्या चिकित्सा संबंधी एक सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.